खरीप 2026: 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर; संपूर्ण यादी

खरीप 2026: महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर

Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या तालुक्यांची महसूल विभाग, जिल्हा आणि तालुकानिहाय संपूर्ण यादी

महत्त्वाचे: महाराष्ट्र शासनाच्या 25 सप्टेंबर 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार खरीप 2026 मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झालेल्या एकूण 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
265
दुष्काळग्रस्त तालुके
34
जिल्हे
6
महसूल विभाग

दुष्काळग्रस्त भागासाठी लागू उपाययोजना

  1. जमीन महसूलात सूट
  2. पीक कर्जाचे पुनर्गठन
  3. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती
  4. कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट
  5. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
  6. रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता
  7. आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा वापर
  8. टंचाई जाहीर केलेल्या गावात कृषी पंपाची वीज जोडणी खंडित न करणे
  9. शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई होणार नाही याची व्यवस्था
  10. जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे
  11. जलसंधारणाची कामे सुरू करणे
  12. पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाण्याचे नियोजन

महसूल विभाग व जिल्हानिहाय तालुक्यांची यादी

ठाणे महसूल विभाग

ठाणे: निरंक

पालघर: निरंक

रायगड (1): श्रीवर्धन

रत्नागिरी (3): रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर

सिंधुदुर्ग (8): सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला

नाशिक महसूल विभाग

नाशिक (10): मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा

धुळे (4): धुळे, साक्री, सिंदखेडा, शिरपूर

जळगाव (15): एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल

नंदुरबार (6): अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा, अक्राणी

अहिल्यानगर (14): नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता

पुणे महसूल विभाग

पुणे (8): भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर

सोलापूर (11): उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा

सांगली (4): मिरज, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ

सातारा (6): सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर

कोल्हापूर (6): पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड

छत्रपती संभाजीनगर महसूल विभाग

छत्रपती संभाजीनगर (9): छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, फुलंब्री

जालना (8): बदनापूर, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद

बीड (11): बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर, वडवणी

लातूर (10): लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, जळकोट

धाराशिव (8): धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परंडा, उमरगा

नांदेड (14): नांदेड, बिलोली, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर, नायगाव

परभणी (9): पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी

हिंगोली (5): हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत

अमरावती महसूल विभाग

बुलढाणा (13): जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, बुलडाणा, सिंदखेडराजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा

अमरावती (14): अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर

अकोला (7): अकोट, अकोला, पातूर, तेल्हारा, मूर्तीजापूर, बाळापूर, बार्शीटाकळी

वाशिम (6): वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा

यवतमाळ (16): यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मारेगाव, झरी-जामणी, केळापूर, घाटंजी, राळेगाव

नागपूर महसूल विभाग

वर्धा (7): वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट, आष्टी

नागपूर (14): नागपूर, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही, नरखेड, नागपूर शहर

भंडारा (3): भंडारा, पवनी, लाखांदूर

गोंदिया (1): तिरोडा

चंद्रपूर (12): चंद्रपूर, भद्रावती, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, मूल, वरोरा, सावली, चिमूर, नागभीड, सिंदेवाही, पोंभुर्णा

गडचिरोली (2): गडचिरोली, चामोर्शी

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची नोंद

या 265 तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे.

ही माहिती आपल्या तालुक्यातील आणि गावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा.

स्रोत: महाराष्ट्र शासन, मदत व पुनर्वसन विभाग, शासन निर्णय क्र. समिती-2026/प्र.क्र.82/मदत-2, दिनांक 25 सप्टेंबर 2026, परिशिष्ट-1.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top