ढोरसडे येथे ऊस पिकाची महिला शेतीशाळा – वर्ग तिसरा उत्साहात संपन्न

ढोरसडे | 28 सप्टेंबर 2026 : मौजे ढोरसडे येथे आज दिनांक 28/09/2026 रोजी ऊस पिकाची महिला शेतीशाळा – वर्ग तिसरा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ऊस पिकातील किडी व रोगांचे निरीक्षण, लष्करी अळीची ओळख तसेच फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्रतिज्ञेने झाली शेतीशाळेची सुरुवात

शेतीशाळेची सुरुवात सामूहिक प्रतिज्ञेने करण्यात आली. त्यानंतर शेतीशाळेच्या रूपरेषेप्रमाणे श्रीमती मनीषा बंडू बर्डे या महिला शेतकरी यांनी मागील वर्गाचा मागोवा सादर केला. मागील वर्गात झालेल्या चर्चेतील बाबींचा आढावा घेत पुढील सत्रासाठी आवश्यक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

ढोरसडे महिला ऊस शेतीशाळा
ढोरसडे येथे महिला शेतकऱ्यांची ऊस शेतीशाळा

लष्करी अळी व ऊस पिकातील किडी-रोगांवर मार्गदर्शन

श्रीमती शिरसाठ मॅडम यांनी लष्करी अळी संदर्भात सविस्तर माहिती दिली. अळीची ओळख, पिकातील प्रादुर्भावाची लक्षणे आणि नियमित निरीक्षणाचे महत्त्व याबाबत महिला शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला.

यानंतर श्रीमती उभेदळ मॅडम यांनी उसावरील विविध किडी व रोग, पीक निरीक्षण आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेतामध्ये पिकाचे निरीक्षण करून विविध बाबींवर चर्चा केली.

महिला शेतकऱ्यांना ऊस पिकाबाबत मार्गदर्शन
महिला शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष शेतात संवाद
महिला ऊस शेतीशाळा मार्गदर्शन
ऊस पिकातील निरीक्षणाबाबत मार्गदर्शन

ICM क्लॅपने शेतीशाळेचा समारोप

शेतीशाळेच्या शेवटी सर्व महिला भगिनींना स्नॅक्स देण्यात आले. त्यानंतर सामूहिक ICM क्लॅप करून शेतीशाळेचा समारोप करण्यात आला. महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्यक्ष शेतातील निरीक्षणावर आधारित चर्चेमुळे तिसरा वर्ग यशस्वीरित्या संपन्न झाला.

ढोरसडे महिला शेतीशाळा समारोप
महिला शेतकऱ्यांच्या सहभागातून शेतीशाळेचा समारोप
महिला शेतीशाळेचा संदेश:
“निरीक्षणातून माहिती, माहितीमधून योग्य निर्णय आणि योग्य निर्णयातून पीक व्यवस्थापनात सुधारणा.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top