मातीतील सूक्ष्मजीवांचे संसर्गजन्य घटक आणि सेंद्रिय पदार्थांचा समावेश करून मातीचे जैविक क्रियाकलाप सुधारणे आणि मातीचे आरोग्य वृद्धिंगत करणे हे नैसर्गिक शेतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नैसर्गिक शेती पद्धतींमध्ये कुज प्रक्रिया आणि पोषकतत्त्वांच्या पुनर्वापरास चालना देण्यासाठी सूक्ष्मजीव संस्कृतींचा समावेश, स्थानिक बियाण्यांचा वापर, पिके, झाडे आणि पशुधन (विशेषतः स्थानिक जातीच्या गायी) यांचे एकत्रीकरण, पिकांमधील योग्य अंतर, पाणी संवर्धनासाठी कंटूरिंग आणि बंधारे, सघन आच्छादन, व्यापक आंतरपीक प्रणाली आणि पीक रोटेशन यांचा समावेश होतो.
शिवाय, माती आणि पाण्याचे संवर्धन वाढवणे, आच्छादन न केलेल्या मातीच्या तुलनेत आच्छादनाखालील मातीचे सरासरी आणि कमाल तापमान कमी करणे, मातीमध्ये बायोमास परत आणणे, मातीतील जैवविविधता वाढवणे आणि पोषकतत्त्वांचे चक्र बळकट करणे यामुळे मल्चिंगचा मातीतील सेंद्रिय कर्ब (SOC) घटकावर सकारात्मक प्रभाव पडतो. नैसर्गिक शेतीचे पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम कमी किंवा अगदी सकारात्मकही असतात.
मागील परिच्छेदांमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नैसर्गिक शेती पद्धती मध्ये मातीतील सेंद्रिय कर्ब (SOC) वाढवतात, तसेच सूक्ष्मजीव आणि मातीतील जिव जंतु क्रियाकलापांमध्ये सुधारणा करतात. परिणामी, या पद्धतीत पीक वनस्पतींसाठी पोषकतत्त्वांचे चक्र आणि उपलब्धता वाढवतात तसेच रायझोस्फियरमध्ये मातीतील ओलावा आणि वायुवीजन सुधारून अनुकूल पर्यावरण राखतात.
नैसर्गिक शेतीतील माती व्यवस्थापन जमिनीची सुपीकता आणि आरोग्य सुधारण्यास हातभार लावते. यामुळे पाण्याचे झिरपणे, पाणी धारणा आणि स्वच्छ व सुरक्षित पाण्याचा प्रवाह वाढतो. परिणामी, जैवविविधता आणि परिसंस्थेचे आरोग्य सुधारते आणि शेतीतील कार्बन उत्सर्जन कमी होऊन वातावरणातील CO₂ चे प्रमाण संतुलित करण्यास मदत होते.
मातीतील नायट्रोजन स्थिरीकरण
वातावरणातील नायट्रोजनचे शोषण करून माती समृद्ध करण्याची क्षमता प्रामुख्याने बॅक्टेरिया आणि आर्कियामध्ये असते. अॅझोस्पिरिलम, अल्कॅलिजेन्स, आर्थ्रोबॅक्टर, अॅसिनेटोबॅक्टर, बॅसिलस, बर्खोल्डेरिया, एन्टरोबॅक्टर, एर्विनिया, फ्लेव्होबॅक्टेरियम, स्यूडोमोनास, रायझोबियम आणि सेराटिया या वंशांतील विविध जीवाणू प्रजाती रायझोस्फियरमध्ये वनस्पतींसोबत राहतात आणि त्यांच्या वाढीस लाभदायक ठरतात. वनस्पती त्यांच्या मुळांच्या स्त्रावांद्वारे (root exudates) विशिष्ट प्रकारचे जीवाणू निवडतात आणि त्यांना पोषण पुरवतात. अशाप्रकारे, रायझोस्फियरमधील जीवाणूंची रचना आणि त्यांची कार्यक्षमता वनस्पतीच्या मुळांच्या स्त्रावांवर अवलंबून असते. हे जीवाणू वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली पोषकतत्त्वे प्रदान करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे नैसर्गिक शेती रायझोबॅक्टेरियाचा प्रभावी वापर करून पिकांची उत्पादकता वाढवण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देते.
नैसर्गिक शेती आणि नायट्रोजन पुरवठा
संशोधनानुसार, नैसर्गिक शेतीमुळे मातीचा ऱ्हास कमी होण्याची शक्यता आहे आणि कमी उत्पादन क्षमता असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळू शकतो. जमिनीत मुक्त-जिवंत नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू किंवा मुळांवर गाठी असलेल्या शेंगभाज्यां मध्ये सहजीवी नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन पुरवतात. संशोधकांच्या अभ्यासानुसार, खताच्या स्वरूपात वापरण्यात येणाऱ्या नायट्रोजनपैकी ५२-८०% जैविक स्थिरीकरणाद्वारे पुरवले जाऊ शकते. यामुळे नैसर्गिक शेती नायट्रोजन पुरवठ्यासाठी एक शाश्वत उपाय ठरते.
मातीतील फॉस्फरस विघन
फॉस्फरस (P) हा जैविक वाढ आणि विकासासाठी एक प्रमुख आवश्यक मुलद्रव्य आहे. सूक्ष्मजीव एक जैविक बचाव प्रणाली प्रदान करतात जी मातीतील अघुलनशील अजैविक फॉस्फरस (P) चे विरघळन करुन ते वनस्पतींना उपलब्ध करून देण्यास सक्षम आहे. काही सूक्ष्मजीवांची अघुलनशील फॉस्फरस (P) ला ऑर्थोफॉस्फेट सारख्या सुलभ स्वरूपात रूपांतरित करण्याची क्षमता ही वनस्पतींच्या उत्पादन वाढवण्यासाठी रायझोबॅक्टेरियममध्ये एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. बॅक्टेरिया वापरणारे रायझोस्फेरिक फॉस्फेट हे नैसर्गिक शेतीत वनस्पतींच्या वाढीस चालना देणाऱ्या घटकांसाठी एक आशादायक स्रोत आहेत.
गाय, शेण आणि मूत्र आधारित जीवामृत फॉर्म्युलेशन चा ZBNF क्षेत्रातील मातीच्या रासायनिक आणि सूक्ष्मजीव गुणधर्मांवर होणारा परिणाम, मेटाजेनोमिक विश्लेषण आणि ZBNF च्या अर्थशास्त्रासह तपासण्यात आला आहे. २०१७ ते २०१९ दरम्यान, सेंद्रिय कार्बन, उपलब्ध फॉस्फरस आणि उपलब्ध पोटॅशियम यासारख्या मातीच्या गुणधर्मांमध्ये टक्केवारीत अनुक्रमे ४६%, ४३९% आणि १४२% पर्यंत वाढ नोंदवली गेली, तर Zn, Fe, Cu आणि Mn सारख्या सूक्ष्म पोषक घटकांमध्ये देखील अनुक्रमे ९८%, २३%, ६२% आणि ५५% पर्यंत वाढ झाली. संपूर्ण जीनोम मेटाजेनोमिक विश्लेषणातून असे दिसून आले की प्रोटीओबॅक्टेरिया प्रामुख्याने उपस्थित होते आणि बॅसिलस, स्यूडोमोनास, रायझोबियम आणि पॅनिबॅसिलससह बुरशीजन्य (phyla) फायला होता. दुसरीकडे, मातीच्या नमुन्यात अस्कोमायकोटा हा प्रमुख बुरशीजन्य (phyla) फायला होता. कार्यात्मक विश्लेषणातून असे दिसून आले की मातीची सुपीकता, वनस्पतींची वाढ, संरक्षण आणि विकासात योगदान देणाऱ्या अमिनो आम्ल आणि कार्बोहायड्रेट चयापचयात सहभागी असलेल्या जीन्स/एंझाइम्सचे उच्च प्रतिनिधित्व होते.
जैविक सूत्रीकरण (जीवामृत आणि घनजीवामृत)
वृक्षयुर्वेदात आंबलेल्या द्रव नैसर्गिक खताचा उल्लेख आहे. मातीच्या आरोग्य सुधारण्यासाठी नैसर्गिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या मुख्य जैविक घटकांमध्ये जीवामृत आणि घनजीवामृत यांचा समावेश आहे.
जीवामृत
जीवामृत हे एक आंबवलेले सूक्ष्मजीव संवर्धन आहे. ते पोषक तत्वे प्रदान करते, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते एक उत्प्रेरक घटक म्हणून कार्य करते, जे मातीतील सूक्ष्मजीवांच्या क्रियाकलापांना प्रोत्साहन देते, जेणेकरून वनस्पतींचे जैविक-उपलब्ध पोषक तत्वांचे संश्लेषण/निर्मिती होईल, स्थानिक गांडुळांची संख्या वाढेल आणि रोगजनकांपासून संरक्षण होईल.
नैसर्गिक शेतीचा असा युक्तिवाद आहे की स्थानिक गायी/पशुधनांच्या शेणात आणि शेतातील अबाधित मातीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध सूक्ष्मजीव असतात, जे वनस्पतींना पोषक तत्वांची उपलब्धता वाढविण्यास मदत करतात. माती ही एक जटिल परिसंस्था आहे जी जीवाणू, बुरशी, वनस्पती आणि प्राणी इत्यादींचे घर असते. मातीतील सूक्ष्मजीव वनस्पतींच्या पोषणासाठी या घटकांना मुक्त करण्यासाठी मातीतून निर्माण होणाऱ्या पोषक तत्वांच्या अविचल स्वरूपाचे चयापचय करतात. नैसर्गिक परिसंस्थांमध्ये, नत्र (N), स्फुरद (P) आणि गंधक (S) सारखे बहुतेक पोषक तत्व सेंद्रिय रेणूंमध्ये बांधलेले असतात आणि म्हणूनच वनस्पतींसाठी ते कमीत कमी उपलब्ध असतात. या पोषक तत्वांचा वापर करण्यासाठी, वनस्पती मातीतील सूक्ष्मजंतू जसे की बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीवर अवलंबून असतात, ज्यांच्याकडे नत्र (N), स्फुरद (P) आणि गंधक (S) च्या सेंद्रिय स्वरूपांचे अपोलिमरीकरण आणि खनिजीकरण करण्याची चयापचय यंत्रणा असते.
गाईच्या शेणापासून सिट्रोबॅक्टर कोसेरी, एन्टरोबॅक्टर एरोजेन्स, एस्चेरिचिया कोलाई, क्लेब्सिएला ऑक्सीटोका, क्लेब्सिएला न्यूमोनिया, क्लुयवेरा spp., मॉर्गरेला मॉर्गानी, पाश्चरेला spp., प्रोव्हिडेन्सिया अल्कॅलिजेन्स, प्रोव्हिडेन्सिया स्टुआर्टियान्ड, आणि स्यूडोमोनास spp. सारख्या अनेक जीवाणूंच्या प्रजाती वेगवेगळ्या केल्या आहेत. अभ्यासीअंती असेही आढळून आले आहे की शेणातील अनेक सूक्ष्मजीवमध्ये फॉस्फेट विद्राव्यीकरणाद्वारे मातीची सुपीकता वाढवण्याचे नैसर्गिक क्षमता आहे. गाईच्या शेणातून २१९ बॅक्टेरियाचे प्रकार वेगळे केले, ज्यातील ५९ वेगळे केलेले नमुने ज्ञात असलेल्या ९० टक्क्यांहून अधिक सुत्रकृमी वर प्रति सुत्रकृमी (सुत्रकृमी नाशक/नॅमेटीसाइडल) कार्य करतात. गायीच्या शेणामध्ये एक बुरशीरोधक घटक असतो जो सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणा-या बुरशींच्या वाढीस प्रतिबंध करतो.
जीवामृत जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या क्रियाकलापांना आणि पानांवर फवारणी केल्यावर फायलोस्फेरिक सूक्ष्मजीवांच्या क्रियाकलापांना चालना देऊन बायोस्टिम्युलंट म्हणून काम करते. ते सूक्ष्मजीव क्रियाकलापांसाठी प्राइमरसारखे काम करते आणि स्थानिक गांडुळांची संख्या देखील वाढवते.
जीवामृत तयार करणे:
1. एका बॅरलमध्ये २०० लिटर पाणी टाकावे.
2. १० किलो ताजे स्थानिक गायीचे शेण टाकावे.
3. ५ ते १० लिटर गोमूत्र टाकावे.
4. २ किलो गूळ टाकावे.
5. २ किलो डाळींचे पीठ आणि शेताच्या बांधातून मूठभर माती टाकावे.
6. द्रावण चांगले ढवळून सावलीत ४८ तास आंबू द्यावे.
जीवामृत वापरण्यासाठी तयार आहे. एक एकर जमिनीसाठी २०० लिटर जीवामृत पुरेसे आहे. ४८ तासांच्या किण्वन प्रक्रियेदरम्यान, शेण आणि मूत्रात असलेले एरोबिक आणि अॅनारोबिक बॅक्टेरिया सेंद्रिय घटक (जसे की डाळीचे पीठ आणि गूळ) खातात, तेव्हा त्यांची संख्या वाढते. मूठभर स्वच्छ माती मूळ प्रजातींच्या सूक्ष्मजंतू आणि जीवाणूंना लसीकरण करण्याचे काम करते. जीवामृत बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य वनस्पती रोगांना प्रतिबंधित करण्यास देखील मदत करते.
जीवामृताचा वापर:
हे मिश्रण दर पंधरा दिवसांनी लावावे. ते थेट पिकांवर फवारावे किंवा सिंचनाच्या पाण्यात मिसळावे. फळझाडांच्या बाबतीत, ते वैयक्तिक वनस्पतींवर लावावे. हे मिश्रण १५ दिवसांपर्यंत साठवता येते.
घनजीवामृत
हे जीवामृताचे कोरडे मिश्रण आहे.
1. २०० किलो शेण जमिनीवर एक थर स्वरूपात पसरवा.
2. त्यावर २० लिटर द्रव जीवामृत घाला आणि ते मिसळा.
3. आता, प्रक्रिया केलेल्या गायीच्या शेणाचा ढीग बनवा आणि ते ज्यूट बॅगने ४८ तास झाकून ठेवा जेणेकरून ते आंबू शकेल.
4. नंतर ते जमिनीवर पसरवा आणि सूर्यप्रकाशात वाळवा. वाळल्यानंतर, ते खोलीत ज्यूट बॅगमध्ये साठवा. हवा वाहत असावी.
5. घनजीवामृत ६ महिन्यांसाठी साठवता येते.
पेरणीच्या वेळी, प्रति एकर २०० किलो घनजीवामृत वापरा. फुलांच्या काळात, प्रति एकर जमिनीवर दोन पिकांच्या ओळींमध्ये ५० किलो घनजीवामृत घालावे. ते मातीला त्यांच्या उपलब्ध पोषक घटकांना, सूक्ष्मजीवांना सक्रिय करण्यास मदत करते, जेणेकरून ते त्या विशिष्ट क्षेत्रात पेरलेल्या पिकासाठी उपलब्ध होतील. ते मातीमध्ये गांडुळांची संख्या वाढवते, जे मातीच्या सुपीकतेसाठी फायदेशीर आहे. घनजीवामृतमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि इतर सूक्ष्म पोषक घटकांसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव क्रियाकलाप वाढवून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खतांचे जलद विघटन करून पोषक घटकांची उपलब्धता वाढवून उच्च उत्पादन सुनिश्चित होईल. यापैकी बरेच फॉर्म्युलेशन फायदेशीर सूक्ष्म वनस्पतींनी समृद्ध आहेत आणि कार्यक्षम वनस्पती वाढीस प्रोत्साहन म्हणून काम करू शकतात.
नैसर्गिक शेतीतील सूक्ष्मजीव विविधता
आच्छादन (मल्चिंग)
आच्छादन (मल्चिंग) म्हणजे जिवंत पिके किंवा पेंढा (मृत वनस्पती बायोमास) सारख्या पिकांच्या अवशेषांचा वापर करून मातीच्या पृष्ठभागावर आच्छादन करणे. यामुळे मातीचे सूर्यप्रकाशापासून थेट संरक्षण होते, बुरशी निर्माण होण्यास मदत होते, मातीच्या वरच्या थराचे संवर्धन होते, पाणी धारण वाढते आणि पाणी जमिनीत खोलवर मुरते, जल-औष्णिक व्यवस्था नियंत्रित करते, मातीतील जीव जंतू यांना प्रोत्साहन देते आणि तणांना प्रतिबंधित करते.
आच्छादनामुळे प्रत्येक पावसानंतर मातीचे कठीण कवच तयार होण्यास प्रतिबंध होतो. ओळींमध्ये ब्लेड हॅरो किंवा आंतरमशागत ऑपरेशन्स वापरल्याने मातीच्या ओलाव्याच्या केशिका नळ्यांची सातत्याने तोडफोड होऊन मातीच्या पृष्ठभागावर ‘धूळ आच्छादन’ तयार होते, ज्यामुळे बाष्पीभवनाचे नुकसान कमी होते.
संशोधन असे सूचित करतात की पिकांचे अवशेष वनस्पतींच्या पोषक तत्त्वांचे चांगले स्रोत आहेत आणि तणांचा दाब कमी करताना पिकाचे उत्पादन आणि पाण्याचा वापर कार्यक्षमता वाढवू शकतात. पिकांचे अवशेष पुनर्वापराच्या दीर्घकालीन अभ्यासातून मातीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक आरोग्यात सुधारणा दिसून आल्या आहेत.
नैसर्गिक शेती अंतर्गत तीन प्रकारचे आच्छादन सुचवण्यात आले आहे:
1. मातीचा आच्छादन: लागवडीदरम्यान मातीचे वरचे थर संरक्षित करते आणि मशागत करून ती नष्ट करत नाही. हे जमिनीत वायुवीजन आणि पाणी टिकवून ठेवण्यास प्रोत्साहन देते. म्हणून, खोल नांगरणी टाळली पाहिजे.
2. स्ट्रॉ आच्छादन: पेंढ्याचे साहित्य सामान्यतः मागील पिकांच्या वाळलेल्या बायोमास / पिकांचे अवशेष ला सूचित करते. कोणत्याही प्रकारचे कोरडे सेंद्रिय पदार्थ मातीच्या जैव घटकाच्या क्रियाकलापाद्वारे विघटित होतात आणि बुरशी तयार करतात, जे सूक्ष्मजीव संवर्धनाद्वारे सक्रिय होतात.
3. जिवंत आच्छादन: माती आणि पिकांना सर्व आवश्यक घटकांचा पुरवठा करण्यासाठी एकाच शेतात उगवणा-या एकदलीय आणि द्विदलीय गटांचे अनेक पीके विकसित करणे आवश्यक आहे. डाळीं वर्गीय पीकां सारखे द्वदलीय गट नायट्रोजन-स्थिर करणा-या वनस्पती आहेत, तर तांदूळ आणि गहू सारखे एकदलीय इतर घटकांचा पुरवठा करतात.
नैसर्गिक शेती उपक्रम मोठ्या प्रमाणात परिवर्तनाचे आश्वासन देतात आणि माती व जलसंपत्तीच्या कार्यक्षम वापरासह शेतीबद्दल विचार करण्याच्या बाबतीत एक नवीन दिशा उघडतात. नैसर्गिक शेतीमध्ये सघन सिंचन आणि खोल नांगरणीला प्रोत्साहन दिले जात नाही. या शेती प्रणालीत मातीचे वायुवीजन, कमीत कमी पाणी देणे, कळ्या आणि जमिनीच्या पृष्ठभागावर आच्छादन करणे देखील प्रोत्साहन दिले जाते. नैसर्गिक शेतीशी संबंधित आच्छादन, जे पिकांच्या अवशेषांनी किंवा आंतरपिकांद्वारे जिवंत आच्छादनाद्वारे आच्छादन केले जाते, ते मातीचे बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जन होऊ देत नाही. व्हापासा, अशी स्थिती आहे जिथे जमिनीत हवेचे रेणू आणि पाण्याचे रेणू दोन्ही असतात. ही स्थिती सिंचनाची आवश्यकता कमी करण्यास मदत करते आणि मातीच्या केशिका कृतीद्वारे पिकांना पाण्याची उपलब्धता वाढवते. आंतरपीक आणि आच्छादनाद्वारे दुष्काळाची परिस्थिती कमी करता येते. हे आंतरपीक आणि आच्छादन परिस्थिती मातीच्या गांडुळांच्या वरच्या ते खालच्या मातीपर्यंत क्रियाकलाप वाढवते. पारंपारिक शेती पद्धतींच्या तुलनेत नैसर्गिक शेतीसाठी ५० ते ६० टक्के कमी पाणी आणि वीज लागते.
नैसर्गिक शेती पद्धती भूजलाचा जास्त उपसा रोखतात, जलचर पुनर्भरण सक्षम करतात आणि अखेरीस पाण्याच्या पातळीत वाढ करण्यास हातभार लावतात.
मातीचे वायुवीजन (वापसा)
जीवामृत आणि आच्छादनामुळे मातीचे वायुवीजन सुधारते, ज्यामुळे मातीची रचना आणि बुरशीचे प्रमाण संतुलित राहते. हे पाण्याचे व्यवस्थापन सुधारून पाण्याची उपलब्धता आणि कार्यक्षमता वाढवते, तसेच दुष्काळाविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित करते.
नैसर्गिक शेतीचे समर्थक हरित क्रांतीतील शेती पद्धतींमध्ये सिंचनाच्या अत्यधिक अवलंबित्वाला विरोध करतात. व्हापासा ही अशी स्थिती आहे जिथे हवेचे आणि पाण्याचे रेणू एकत्रितपणे जमिनीत अस्तित्वात असतात. त्यामुळे फक्त दुपारी, पर्यायी सऱ्यांमध्ये सिंचन केल्याने पिकांच्या ओलाव्याच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये सिंचनाची गरज लक्षणीयरीत्या कमी होते.
व्हापासा तत्त्वामुळे मातीचे वायुवीजन वाढते आणि वनस्पतींच्या मुळांच्या क्षेत्राभोवती (रायझोस्फियर) हवा आणि मातीतील ओलावा योग्य प्रमाणात राखला जातो. सिंचित भागात किंवा जास्त पावसाच्या परिस्थितीत, जास्त पाण्यामुळे मुळांना आवश्यक असलेली हवा मिळणे कठीण होते, त्यामुळे मुळे कुजण्याची शक्यता वाढते. त्यामुळे व्हापासा स्थिती माती आणि मुळांशी संबंधित रोगांना प्रतिबंध करते.
माती आणि जलसंधारण पद्धती
माती आणि जलसंधारणाचे जैविक उपाय (कृषी, कृषिवनीकरण) मातीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक आवरणामुळे पावसाच्या थेंबांचा प्रभाव कमी करतात. हे उपाय मातीची झिरपण्याची क्षमता वाढवतात, त्यामुळे पाणी शोषले जाते आणि वाहून जाणाऱ्या मातीचे नुकसान टाळले जाते.
हे जैविक उपाय किफायतशीर, शाश्वत आणि संरचनात्मक उपायांपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतात. ते मातीची धूप रोखतात आणि पाण्याच्या साठवण क्षमतेत वाढ करतात, ज्यामुळे शेती अधिक उत्पादनक्षम आणि पर्यावरणपूरक होते.
माती आणि जलसंधारणासाठी महत्त्वाच्या कृषी उपायांचे वर्णन
हिरवळीच्या खतांचा वापर:
हिरवळीचे खत म्हणून वापरण्यात येणाऱ्या न कुजलेल्या हिरव्या पदार्थांना हिरवळीचे खत म्हणतात. हे दोन प्रकारे मिळवले जाते—हिरवळीचे खत पिके वाढवून किंवा पडीक जमिनीत, शेताच्या बांधांमध्ये आणि जंगलात वाढलेल्या वनस्पतींपासून हिरवी पाने (डहाळ्यांसह) गोळा करून. हिरवळीचे खत प्रामुख्याने शेंगा वर्गीय कुटुंबातील वनस्पतींपासून मिळते आणि पुरेशी वाढ झाल्यावर ते जमिनीत गाडले जाते. हिरवळीच्या खतासाठी उगवलेल्या वनस्पतींना हिरवळीचे खत पिके म्हणतात.
प्रमुख हिरवळीचे खत पिके म्हणजे ताग, धैंचा, रानमाठ, गवार आणि शेवरी.
समोच्च शेती (कॉन्टूर फार्मिंग):
डोंगराळ आणि उतार असलेल्या जमिनींमध्ये माती व पाणी संवर्धनासाठी समोच्च शेती (कॉन्टूर फार्मिंग) ही एक प्रभावी कृषी पद्धती आहे. नांगरणी, पेरणी, आंतरमशागत इत्यादी सर्व शेती कार्ये समान उंचीवरील रेषांवर केली जातात. उतारावर तयार झालेल्या खाचर मुळे वाहत्या पाण्याला अडथळे निर्माण होतात, त्यामुळे प्रवाहाचा वेग कमी होतो आणि मातीच्या धुपीचे प्रमाण कमी होते.
कमी पावसाच्या भागांत समोच्च शेती (कॉन्टूर फार्मिंग) मुळे मातीतील ओलावा टिकवला जातो, तर जास्त पावसाच्या भागांत मातीचे नुकसान कमी होते. या पद्धतीमुळे मातीची सुपीकता आणि ओलावा टिकतो, परिणामी पीक उत्पादकता सुधारते. मात्र, या पद्धतीची प्रभावीता पावसाची तीव्रता, मातीचा प्रकार आणि भू-रचनेवर अवलंबून असते.
पिकांची निवड:
माती आणि पाणी संवर्धनासाठी योग्य पिकांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. पिकाची निवड करताना पावसाची तीव्रता, बाजारपेठेची मागणी, हवामान आणि शेतकऱ्यांची उपलब्ध संसाधने यांचा विचार करावा.
– ज्वारी, मका, बाजरी यांसारखी उंच वाढणारी पिके माती उघडी ठेवून धूप वाढवतात.
– चवळी, उडीद, भुईमूग यांसारखी दाट कॅनोपी असलेली पिके मातीचे संरक्षण करतात आणि धूप रोखतात.
– पिकांच्या कॅनोपी घनतेत वाढ करण्यासाठी बियाण्यांचे प्रमाण जास्त असावे.
पीक फेरपालट:
एका शेतात वेगवेगळी पिके फेर बदल करून घेण्याच्या पद्धतीला पीक फेरपालट म्हणतात. यामुळे तण, कीटक व वनस्पती रोगांचे प्रमाण कमी होते आणि मातीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा होते.
– एकच पीक घेण्याने मातीतील पोषक तत्त्वे कमी होतात, तर पीक फेरपालटीत शेंगा वर्गीय पिकांचा समावेश केल्यास मातीची सुपीकता वाढते.
– शेंगा वर्गीय पिके मातीतील नायट्रोजनची पातळी वाढवतात, परिणामी माती आणि पाणी संवर्धनास मदत होते.
– योग्य पीक फेरपालट मातीचे आरोग्य सुधारते आणि पाण्याची आवश्यकता कमी करते.
आंतरपीक/मिश्र पीक:
वेगवेगळ्या उंचीची पीकाची छत्रछाया व वेगवेगळ्या परिपक्वतेच्या वेळेसह एकाच वेळी वेगवेगळी पिके घेतली जातात यास आंतरपीक/मिश्र पीक पध्दती म्हणतात. यामुळे विशिष्ट प्रकारच्या वनस्पती पोषक तत्त्वांची मागणी कमी होते आणि विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन नियमितपणे उपलब्ध होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते.
आंतरपीक पीक:
आंतरपीक म्हणजे एका शेतात दोन किंवा अधिक पिकांची लागवड निश्चित किंवा पर्यायी ओळींमध्ये करणे. ही लागवड पिकांचे प्रकार, मातीचा प्रकार, भौगोलिक रचना आणि हवामानाच्या परिस्थितीनुसार ओळी आंतरपीक (Row Intercropping), पट्टा आंतरपीक (Strip Intercropping) आणि रिले आंतरपीक (Relay Intercropping) अशा प्रकारे वर्गीकृत केली जाऊ शकते. आंतरपीक लागवड वेळेच्या तसेच जागेच्या योग्य नियोजनावर आधारित असते. एकमेकांपेक्षा वेगळी मुळे असलेली पिके निवडणे फायदेशीर ठरते. आंतरपीक लागवड मातीच्या पृष्ठभागावर अधिक चांगले आच्छादन निर्माण करते, पावसाच्या थेंबांचा थेट परिणाम कमी करते आणि मातीचे धूपपासून संरक्षण करते.
– आंतरपीक पद्धतीमुळे मातीचे संरक्षण होते, पोषक तत्त्वांचे नुकसान कमी होते आणि उत्पन्न वाढते.
– धूप परवानगी देणारी आणि धूप प्रतिरोधक पिके एकत्र घेतल्यास मातीची धूप नियंत्रित करता येते.
आच्छादन पिके:
मातीचे धूप होण्यापासून संरक्षण करण्यासाठी जवळ वाढणारी पिके घेतली जातात ज्यांना आच्छादन पिके म्हणतात. शेंगांच्या पिकांमध्ये ओळीच्या पिकांपेक्षा मातीचे संरक्षण करण्यासाठी चांगले बायोमास असते. आच्छादन पिकांची प्रभावीता पिकांच्या आकारमानवर आणि पावसाच्या थेंबांना रोखण्यासाठी छताच्या विकासावर अवलंबून असते ज्यामुळे मातीच्या पृष्ठभागावर धूप होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. लागवड केलेल्या पडीक आणि ज्वारी पिकांच्या तुलनेत शेंगदाणे जमिनीला वाहून जाण्यापासून आणि मातीच्या नुकसानापासून चांगले संरक्षण देतात. सर्वात प्रभावी कव्हर पिके म्हणजे चवळी, हरभरा, उडीद, भुईमूग इत्यादी.
पट्टा पीक पद्धती:
एकाच शेतात खोलवर मुळांची आणि उच्च छत्रछायाची घनता असलेल्या धूप परवानगी देणाऱ्या आणि धूप प्रतिरोधक पिकांच्या लागवड पध्दती याला पट्टा पीक म्हणतात. ही पद्धत पाणी प्रवाहाचा वेग कमी करते आणि शेतातून धूप प्रक्रिया आणि पोषक तत्वांचे नुकसान रोखते. धूप प्रतिरोधक पिके पावसाच्या थेंबांच्या प्रभावापासून मातीचे संरक्षण करतात, पाणी प्रवाहाचा वेग कमी करतात आणि त्यामुळे मुरण्याचा वेळ वाढवतात ज्यामुळे मातीतील ओलावा जास्त प्रमाणात मिळतो आणि पीक उत्पादन वाढते. पाणी प्रवाह आणि धूप नियंत्रित करण्यासाठी आणि त्यामुळे मातीची सुपीकता राखण्यासाठी पट्टा पीक घेतले जाते. नैसर्गिक शेती चे पाच थरांचे मॉडेल या प्रकारच्या पीक पद्धतीचे उत्तम उदाहरण आहे.
कृषीवनीकरण:
कृषीवनीकरण जमिनीच्या वापराच्या प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा वापर करते, ज्यामध्ये झाडे, झुडपे, पाम इत्यादी वृक्षाच्छादित बारमाही वृक्ष, कृषी पिके आणि/किंवा जनावरे या सारख्या जमीन व्यवस्थापन घटक यांचा प्रभावीपणे एकतर स्थानिक व्यवस्थेच्या स्वरूपात किंवा एका विशिष्ट क्रमाने एकत्रित वापरल्या जातात. कृषीवनीकरण प्रणाली मधील वेगवेगळ्या घटकाचा एकमेकांशी पर्यावरणीय आणि आर्थिक परस्पर संबध असतात.
कमी प्रमाणात मशागत:
मातीचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यधिक मशागत टाळणे आवश्यक आहे. मशागत केल्यास मातीतील ऑक्सिजन वाढतो, त्यामुळे सूक्ष्मजीव क्रियाशील होऊन सेंद्रिय पदार्थांचा वेगाने विघटन होतो. जास्त मशागत केल्यास मातीची सच्छिद्रता कमी होते, नांगराचा थर तयार होतो आणि मुळांच्या वाढीला अडथळा निर्माण होतो. तसेच मशागत केल्याने मायकोरायझल बुरशीचे जाळे विस्कळीत होते, त्यामुळे मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीवसंख्या घटते. मातीच्या वरील थराला पूर्णपणे उलथवून टाकण्याची नांगरणी पद्धत यामुळे पीक अवशेषांद्वारे प्रदान केलेले मातीचे आच्छादन कमी होते, त्यामुळे माती अधिक प्रमाणात धूपीसाठी उघडी पडते.
मशागतीमुळे मायकोरायझल बुरशींचे हायफल जाळे देखील विस्कळीत होऊ शकते, ज्यामुळे कालांतराने त्यांची संख्या कमी होऊ शकते. काळजीपूर्वक व्यवस्थापन न केल्यास, बहुतेक उलटे आणि सुलटे मशागती पद्धती जमिनीखालील माती दाबतात, ज्यामुळे नांगराचा थर तयार होतो, ज्यामुळे मुळांची वाढ आणि जमिनीखालील पाणी आणि पोषक तत्वांचा प्रवेश मर्यादित होतो. जास्त यंत्राची चाके आणि पायांची वाहतूक पृष्ठभागावरील माती दाबू शकते, ज्यामुळे मॅक्रो सच्छिद्रता कमी होते आणि मुळांच्या वाढीस अडथळा येतो.
सूक्ष्म सिंचनाद्वारे जैव सूत्रीकरणांचा वापर
पाण्यावरील मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी आणि पाण्याचा वापर कार्यक्षमता वाढवण्यासाठी नैसर्गिक शेती अंतर्गत सूक्ष्म सिंचन पद्धती एकत्रित केल्या जातात. शेण आणि गोमूत्र यांसारखे नैसर्गिक निविष्ठा तयार करण्यासाठीचे घटक गोशाळेत असलेल्या टाकीमध्ये गोळा केले जातात. स्वयंचलित गाळणीनंतर, हे जीवामृत सारख्या नैसर्गिक शेती निविष्ठा तयार करण्यासाठी वापरले जातात आणि मानवी श्रमाचा सहभाग न घेता सूक्ष्म सिंचनाद्वारे पिकांना लागू केले जातात. अनेक नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती जैव-सूत्रीकरणांच्या प्रवाही आणि ठिबक सिंचनासाठी प्रणाली डिझाइन आणि विकसित केल्या आहेत. या डिझाइनमध्ये द्रव सूत्रीकरणातून कचरा आणि कणयुक्त पदार्थांचे अवशेष काढून टाकण्यासाठी गाळणी आणि पाझर कक्ष तयार करणे समाविष्ट आहे. मग कल्पकतेने डिझाइन केलेल्या पंप आणि मिक्सिंग सिस्टीमसह, हे कमीत कमी श्रम हस्तक्षेपासह चालतात.