तिफण फाउंडेशन – कृषी गौरव 2025

“प्रेरणा • प्रयत्न • परिणाम – कृषी गौरव 2025”

🏆 प्रस्तावना

तिफण फाउंडेशनकडून कृषी क्षेत्रातील असामान्य योगदानाचा गौरव करण्यासाठी “कृषी गौरव 2025” पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
या पुरस्कारांचा उद्देश –

  • शेतकरी, महिला व तरुण उद्योजकांचे उल्लेखनीय कार्य अधोरेखित करणे
  • नवनवीन तंत्रज्ञान, शाश्वत शेती व ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देणे
  • प्रेरणादायी कार्य करणाऱ्यांना राज्यभरात व्यासपीठ देणे

✨ पुरस्कारांची वैशिष्ट्ये

महाराष्ट्र राज्यातील 16 राज्यस्तरीय पुरस्कार

त्यापैकी 3 विशेष महिला सशक्तीकरण पुरस्कार

प्रत्येक पुरस्कारास सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह

विजेत्यांचा गौरव शिर्डी येथे दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते

दोन दिवसांच्या विशेष कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी

📌 निकष व मूल्यांकन

नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा वापर

शाश्वत व पर्यावरणपूरक शेती पद्धती

सामाजिक योगदान व प्रेरणादायी कार्य

इतर शेतकऱ्यांना दिलेली दिशा, मार्गदर्शन व नेतृत्व

3MinForMahaFarmers
Scroll to Top