भारत हा कृषिप्रधान देश असून इथल्या बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरेसा व दर्जेदार अन्नपुरवठा करण्यासाठी पिकांचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. मात्र फक्त उत्पादन वाढवणेच नव्हे तर ते टिकाऊ व नफ्यात राहील अशा पद्धतीने करणे महत्वाचे आहे. पिक व्यवस्थापन ही संकल्पना केवळ पिके लावण्यापुरती मर्यादित नसून, मातीपासून बाजारपेठेपर्यंतचा संपूर्ण प्रवास व्यवस्थित आणि वैज्ञानिक पद्धतीने हाताळण्याचा व्यापक दृष्टीकोन आहे. पिक व्यवस्थापन व उत्पादन वाढ यासाठी संपूर्ण शेतीमध्ये शाश्वत आणि एकात्मिक गोष्टींचा अवलंब अत्यंत आवश्यक आहे.
पिक व्यवस्थापनाची संकल्पना
“पिक व्यवस्थापन” म्हणजे पिकाची निवड, मातीची तयारी, बियाण्यांची पेरणी, खतांचा वापर, पाणीपुरवठा, कीड-रोग नियंत्रण, तणनियंत्रण, काढणी, साठवण आणि विक्री या सर्व टप्प्यांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन. योग्य पिक व्यवस्थापन केल्यास उत्पादनात २०-३०% वाढ होते तसेच उत्पादन खर्चातही बचत होते.
पिक व्यवस्थापनाचे प्रमुख घटक
मृदा व्यवस्थापन
माती ही शेतीचे मूळ भांडवल आहे. मातीची सुपीकता टिकवण्यासाठी खालील बाबी महत्वाच्या –
मृदा परीक्षण – जमिनीतील पीएच, सेंद्रिय कार्बन, नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्मअन्नद्रव्यांची पातळी जाणून घेणे गरजेचे असते. पिक लागवडीपूर्वी मृदा परीक्षण करणे आवश्यक असते.
सेंद्रिय खतांचा वापर – शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे खत हे मातीसाठी वरदान आहे. मातीतील सेंद्रीय घटक वाढविण्यासाठी यांचा वापर अत्यंत आवश्यक असतो.
पीक फेरपालट – नायट्रोजन स्थिरीकरण करणारी कडधान्ये घेऊन जमिनीची सुपीकता वाढवणे शाश्वत शेतीसाठी आवश्यक असते. वारंवार एकच पिक घेतल्यामुळे जमीनीचा पोत आणि उत्पादकता दोन्ही खालावते.
माती धूप नियंत्रण – आडवा बांध, गवताचे पट्टे, पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करणे शेतीमध्ये मातीची धूप थांबविण्यासाठी आवश्यक असते.
पाणी व्यवस्थापन
पाण्याचा अपुरा किंवा जास्त पुरवठा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम करतो.
ठिबक व तुषार सिंचन – पाणी बचत (४०-५०%) व खतांचे कार्यक्षमतेने वितरण होते. कमी पाण्यात जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता येते.
पाणी पुरवठ्याचा वेळापत्रक – पिकाच्या महत्त्वाच्या वाढीच्या टप्प्यांवर योग्य प्रमाणात पाणी देणे आवश्यक असते. अति जास्त पाणी पिकांचे नूकसान करते तसेच पाण्याचा अति ताण देखील पिकास धोकादायक असतो.
पाणी साठवण – शेततळे, फार्म पाँड, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शेतातील खोल चर यामुळे शाश्वत सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता होते.
बियाणे निवड
प्रमाणित व रोगमुक्त बियाण्यांचा वापर करणं अत्यंत गरजेचं असतं यामुळे पिकाचे किड रोगांपासून संरक्षण होते. उत्पन्न जास्तीत जास्त वाढण्यास मदत होते.
स्थानिक हवामानाला अनुरूप वाणांची निवड केल्यास पिकावर संभाव्य किड रोगांचा धोका कमी होतो.
उगवणक्षमता चाचणी करूनच पेरणी केल्यास हेक्टरी रोपांची संख्या योग्य ठेवणे शक्य होते. तसेच खराब बियाण्यामुळे ओढवणारे दुबार पेरणीचे संकट टाळता येते.
नवीन उच्च उत्पादन देणारे वाण (HYV) किंवा संकरित वाणांचा अवलंब केल्यास पिक उत्पादनात वाढ होते.
खत व्यवस्थापन
समतोल खत वापर – माती परीक्षणानुसार नत्र, स्फुरद, पालाशचा वापर करणं अत्यंत आवश्यक असतं.बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत खालावून जमीन निकामी होते.
सूक्ष्म अन्नद्रव्ये – झिंक, गंधक, बोरॉनची योग्य मात्रेत फवारणी यामुळे पिकाला आवश्यक सुक्ष्म घटकांची गरज योग्य वेळी भागवली गेली की उत्पादनात वाढ होते.
जैवखते – रिझोबियम, अझोटोबॅक्टर, फॉस्फोबॅक्टेरिया यांच्या वापरामुळे पिकाचे आणि जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावता.
फर्टिगेशन – ठिबकद्वारे खतांचा पुरवठा केल्यास थेट पिकास आवश्यक घटक उपलब्ध होतात. मोठ्या प्रमाणात खतांचा अपव्यय टाळणे शक्य होते.
कीड व रोग नियंत्रण
एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) – मित्र कीटकांचे संरक्षण, फेरोमोन सापळे, प्रकाश सापळे, जैविक कीटकनाशकांचा वापर करून सुलभ पद्धतीने किड नियंत्रण ठेवणे शक्य होते.
एकात्मिक रोग व्यवस्थापन (IDM) – रोगप्रतिरोधक वाण, बियाण्यांची प्रक्रिया, योग्य पाणी व खत व्यवस्थापन करणे आवश्यक असते यामुळे पिक रोगमुक्त ठेवण्यास मदत होते.
तण नियंत्रण
यांत्रिक तणनियंत्रण – खुरपणी, तण काढणी यंत्रे यांचा वापर करून सहज तणनियंत्रण शक्य होते.
रासायनिक तणनाशके – पेरणीपूर्व व पेरणीनंतर योग्य प्रमाणात वापर केल्यास तणनियंत्रण अगदी सहज होते. पण संतुलित पद्धतीने तणनाशकांचा वापर करणे पिक आणि माती दोघांसाठी फायदेशीर ठरते.
पीक फेरपालट व मल्चिंगद्वारे तण आटोक्यात ठेवणे.
उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान
ड्रोन तंत्रज्ञान – फवारणी, पिकांचे आरोग्य निरीक्षण यामुळे शक्य आहे. अचूक आणि अत्यल्प वेळेत फवारणी करणे शक्य होते. तसेच मनुष्यबळात बचत होते.
मोबाइल अॅप्स – हवामान, कीड-रोग सल्ला, बाजारभाव , एआय यामुळे अचूक माहिती आणि सल्ला मिळतो.
स्मार्ट सेन्सर – मातीतील आर्द्रता व पोषण पातळीचे मोजमाप करणे शक्य होते त्यामुळे खतांचा आणि पाण्याचा संतुलित वापर करता येतो त्यामुळे शेती देखिल स्मार्ट होईल.
हायड्रोपोनिक्स व एरोपोनिक्स – मृदाविरहित शेती पद्धती- नवीन तंत्रज्ञानावर आधारित हायड्रोपोनिक्स मातीविरहीत शेती पद्धतींचा अवलंब करून शेतीमध्ये बदल घडवने शक्य आहे.
शाश्वत शेती व उत्पादन वाढ
उत्पादन वाढवताना पर्यावरणाचे नुकसान होऊ नये यासाठी
सेंद्रिय व जैविक शेतीचा प्रसार आणि अवलंब करणे गरजेचे आहे.
कमी पाणी लागणाऱ्या पिकांचा अवलंब- पाण्याचा संतुलित वापर करण्यासाठी कमीत कमी पाणी लागणाऱ्या पिकांची आणि वाणांची निवड करावी.
अक्षय ऊर्जा वापर (सौर पंप, सौर ड्रायर)- नैसर्गिक रित्या उपलब्ध असणाऱ्या ऊर्जास्रोतांचा वापर केल्यास विजेच्या खर्चात बचत होते. तसेच पर्यावरणाचे संरक्षण होते.
कृषी कचऱ्याचे पुनर्वापर- शेतीमध्ये उपलब्ध होणाऱ्या कचऱ्याचा योग्य पद्धतीने पुनर्वापर केल्यास मातीचा पोत सुधारतो.
पिक व्यवस्थापन ही फक्त तांत्रिक बाब नसून शेतकऱ्याची दृष्टी, शिस्त, आणि आधुनिक ज्ञानाशी जुळवून घेण्याची तयारी यावर आधारित आहे. योग्य नियोजन, संसाधनांचा कार्यक्षम वापर, आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास केवळ उत्पादनच वाढणार नाही तर शेती अधिक नफ्यात आणि शाश्वत होईल.
पिक व्यवस्थापन म्हणजे काय?
पिक व्यवस्थापन म्हणजे बियाण्यांची निवड ते विक्रीपर्यंत पिकाच्या प्रत्येक टप्प्याचे वैज्ञानिक नियोजन व नियंत्रण होय. यामध्ये माती परीक्षण, खत वापर, पाणीपुरवठा, कीड-रोग नियंत्रण आणि तणनियंत्रण यांचा समावेश होतो.
पिक उत्पादन वाढवण्यासाठी कोणते उपाय करावेत?
मृदा परीक्षणानुसार खत वापर, ठिबक सिंचन, प्रमाणित बियाणे, पीक फेरपालट, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन २०–३०% ने वाढवता येते.
शाश्वत शेतीसाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत?
सेंद्रिय शेती, जैवखते, कमी पाणी लागणारी पिके, अक्षय ऊर्जेचा वापर आणि कृषी कचऱ्याचे पुनर्वापर हे शाश्वत शेतीचे महत्त्वाचे घटक आहेत.
आधुनिक तंत्रज्ञान पिक व्यवस्थापनात कसे मदत करते?
ड्रोन तंत्रज्ञान, स्मार्ट सेन्सर, मोबाइल अॅप्स आणि फर्टिगेशन यामुळे अचूक सिंचन, खत वापर आणि कीड नियंत्रण शक्य होते. यामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो.
मृदा परीक्षण का आवश्यक आहे?
मृदा परीक्षणामुळे जमिनीतील पोषणद्रव्यांची अचूक माहिती मिळते, त्यानुसार खतांचा वापर करता येतो आणि जमिनीची सुपीकता टिकवता येते.
उत्कृष्ट लेख आहे
धन्यवाद
धन्यवाद 🙏
हा लेख माहितीपूर्ण, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहे. यात वैज्ञानिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना पिक व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले आहे. माती परीक्षण, एकात्मिक पोषकद्रव्य व्यवस्थापन, ठिबक सिंचन, तसेच सेंद्रिय शेती यावर दिलेला भर योग्य आहे.
तुमचा विषय “पिक व्यवस्थापन व उत्पादन वाढ – शाश्वत शेतीसाठी वैज्ञानिक उपाय” खूप छान आणि सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहे 🌱
Good
मृदा परीक्षणामुळे जमिनीतील पोषणद्रव्यांची अचूक माहिती मिळते, त्यानुसार खतांचा वापर करता येतो आणि जमिनीची सुपीकता टिकवता येते.
. जमिनीची सुपीकता टिकवंण्यासाठी मृद चाचणी दर तीन वर्षातून एकदा केली पाहिजे.
शाश्वत शेती मधील वैज्ञानिक उपाय योजना अत्यंत उपयुक्त व महत्वपूर्ण आहे. 👍👍
शेती करताना नवनवीन तंत्रज्ञान चा उपयोग करण्यासाठी अशा तंत्रशुद्ध माहितीचा खूप उपयोग होऊ शकतो कारण शेतकरीच बियाणे उगवण्यापासून ते त्याच्या काढणीपर्यंतच्या प्रत्येक निर्मितीचा आनंद तो रोज घेत असतो आणि यामध्ये त्याला रोज नवनवीन निर्णय तात्काळ घ्यायच्या असतात यासाठी या माहितीचा उपयोग निश्चित होणार आहे.
GM, it’s nice to see Detailed discussion on non chemical agri. We would definitely take advantage of SOP . Thanks n Regards
पिक व्यवस्थापन व उत्पादन वाढ – शाश्वत शेतीसाठी वैज्ञानिक उपाय या लेखातून आपण परिपूर्ण माहिती दिलेली आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद…. असेच लेख लिहीत जावा म्हणजे आम्हाला पण नवनवीन माहिती मिळत राहील
शाश्वत शेतीसाठी जिवाणू खत उपलब्ध होत आहे आणि सदर कामे करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शाश्वत शेतीसाठी जिवाणू खत उपलब्ध होत आहे आणि सदर कामे करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
छान लिखाण.उदाहरणासह अजून छान लिहिता येईल
सुंदर लेख…👌👍
धन्यवाद