आले फळ तेव्हा राहिले पिकोन । जरि ते जतन होय देठीं

अर्थाअर्थी
“आले फळ तेव्हा राहिले पिकोन । जरि ते जतन होय देठीं ।”

शेतीत पिक तयार होणं म्हणजेच “फळ येणं”. पण तुकाराम महाराज सांगतात — फळ आल्यावरही ते टिकवण्याची काळजी घ्या.
आजच्या काळात शेतकऱ्यानेही हेच समजावं —
पिक घेणं म्हणजे शेती संपली नाही; त्यानंतर उत्पादन जतन करणं, साठवणूक, प्रक्रिया, बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मूल्यवर्धन हेदेखील शेतीचाच भाग आहे.

म्हणजेच फक्त पिक घेणे नव्हे, तर पिक टिकवणे आणि त्याचे मूल्य वाढवणे ही खरी शेतकऱ्याची जबाबदारी आहे.

“नामेंचि सिद्धि नामेंचि सिद्धि । व्यभिचारबुद्धि न पवता ।”

या ओळीतून संदेश मिळतो की, केवळ नावापुरते काम करून काही साध्य होत नाही.
आजच्या काळात अनेक शेतकरी योजनांचे, प्रकल्पांचे, नावापुरते पालन करतात, परंतु खरी प्रामाणिक अंमलबजावणी नसते.

शेतात प्रयोग करताना, नैतिकतेने काम करताना “व्यभिचारबुद्धी” म्हणजे शॉर्टकट, बनावट अहवाल, चुकीचे मार्ग हे टाळणे आवश्यक आहे.

शुद्ध मनाने, पारदर्शकतेने आणि प्रामाणिकपणे शेती केली तरच खरी “सिद्धी” मिळते — म्हणजेच चांगले पैसे, पत, पद, प्रसिद्धी, आणि आत्मसंतोष.

“चालिला पंथ तो पाववील ठाया । जरि आड तया न ये काही ॥”

आधुनिक शेतकऱ्याने एकदा ठरवले की “मी शाश्वत शेती करणार”, “मी सेंद्रिय पद्धत वापरणार”, “मी मृदा परीक्षणावर आधारित निर्णय घेणार” —
तर त्या मार्गावर संकटे आली तरी डळमळता कामा नये.
अडथळे येतील — हवामान बदल, अतिविष्टी, लोकांचे टोमणे, मनाची निराशा, बाजारभाव, कामगारांची कमतरता — पण ठाम राहिल्यास परिणाम नक्की येतो.

निष्ठा, सातत्य आणि धैर्य — हेच यशस्वी शेतकऱ्याचे तीन पाय आहेत.

“तुका म्हणे मध्ये पडती आघात । तेणे होय घात हानि लाभ ।”

शेती हा जोखीम असलेला व्यवसाय आहे — दुष्काळ,अतिवृष्टी, अवकाळी, पावसाचे अतिरेकी प्रमाण, कीड-रोग, बाजारातील चढउतार हे “आघात” आहेत.
पण तुकाराम महाराज सांगतात — हे आघात नेहमी वाईट नसतात; ते शिकवतात, पुढच्या हंगामासाठी तयार करतात.
शेतकरी प्रत्येक संकटातून अनुभव घेतो आणि पुढच्या वेळी अधिक सक्षम बनतो.
हानि-लाभ हे दोन्हीच जीवनाचा भाग आहेत; पण शेतकऱ्याचे मन जर स्थिर आणि आशावादी असेल, तर प्रत्येक आघात नवा धडा ठरतो.

संकलन – TIFAN Foundation

3MinForMahaFarmers

Leave a Reply

Scroll to Top