उत्पन्नाचे मार्ग – आर्थिक सुरक्षेचा आधार

शेतकरी आणि आर्थिक सुरक्षा-

शेती हा निसर्गाचा जुगार आहे – हे वाक्य खरे आहे. पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई यांच्यामुळे कधीकधी शेतकऱ्याचे सर्वस्व संपुष्टात येते. अशा वेळी फक्त शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाचे दुःख शब्दात मांडता येत नाही. घराचा तोंडचा घास निघून जातो आणि शेतकरी असहाय्यतेच्या भोवऱ्यात अडकतो.

काय आहे अर्थशास्त्राचे सुवर्ण सूत्र-

अर्थशास्त्र आपल्याला का शिकवते –


“Don’t put all your eggs in one basket” (सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नका). उत्पन्नाचे अनेक मार्ग असणे ही आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. एक मार्ग बंद झाला तरी दुसरे मार्ग तुम्हाला बुडू देत नाहीत. शेतकऱ्यांनाही या तत्त्वाचा अवलंब करावा लागेल.त्यासाठी काय करता येईल..

एकात्मिक शेती –

1.विविध प्रकारची पिके घेने…


कडधान्ये तसेच तृणधान्ये, नगदी पिक, बारमाही पिके- केळी, द्राक्ष, डाळिंब या प्रकारचे फळपिके किंवा विविध प्रकारची एकात्मिक पद्धतीची पिकाची लागवड गरजेची आहे.

पशुसंवर्धन व्यवसाय


गाई म्हशी या दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. दुग्ध व्यवसाय हा नगदी पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे आणि शेतकऱ्याला उभारी देणार आहे.

3.मूल्यसंवर्धन व्यवसाय


आपण बघतो की तुरीची डाळ दीडशे रुपये किलो आणि तुरी बाजारात विकायला गेले तर 60 रुपये किलोने विक्री करावी लागते. यासाठी शेती मालाचे मूल्यवर्धन करणे शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. नक्कीच हे एका शेतकऱ्याचे काम नाही परंतु शासन मूल्य संवर्धन यासाठी शेतकरी कंपन्या बचत गट यांना अनुदान देत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी याकडे सुद्धा लक्ष द्यावे.

दीर्घकालीन फायदे-


-वृक्ष लागवडीतून 10-15 वर्षांत मोठे उत्पन्न मिळते.
जमिनीची सुपीकता वाढते
पर्यावरणाचे संरक्षण होते

शेतकरी हा नैसर्गिक अर्थशास्त्री


शेतकऱ्यांना अर्थशास्त्र समजत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. तो जगाचा पोषक आहे आणि निसर्गाच्या चक्राला समजून घेऊन काम करतो. फक्त काही आर्थिक अडचणी किंवा माहितीची कमतरता यामुळे तो काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

मग सुरुवात कधी करायची तर आतापासूनच सुरुवात करा…
छोट्या प्रमाणात सुरुवात-2-3 गायी, 10-15 कोंबड्या किंवा शेळीपालन व्यवसाय सुरू
हंगामी भाज्य किंवा भाजीपाला लागवडीतून आर्थिक नफा जास्त मिळतो हंगामानुसार भाजीपाला घेता येतो.
3.फळझाडे लावावे..

आजचा शेतकरी हा भूतकाळाच्या पारंपारिक पद्धतींचा वारसदार आहे, परंतु तो भविष्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन मार्गांचा अवलंब करू शकतो. उत्पन्नाचे अनेक मार्ग निर्माण करून तो आर्थिक संकटांवर मात करू शकतो.

एक मार्ग बंद झाला तरी इतर मार्ग उभे ठेवतील. शेती हा मुख्य व्यवसाय राहू द्या, परंतु त्यासोबतच इतर उत्पन्नाचे साधने निर्माण करा. ज्ञानाचा, अनुभवाचा आणि कष्टाचा वापर करून एक समृद्ध भविष्य घडवा.

तुमची शक्ती तुमच्या हातात आहे ,त्याचा सदुपयोग करा. जोपर्यंत आर्थिक उत्पन्नाचे अनेक स्त्रोत शेतकरी निर्माण करत नाही, तोपर्यंत नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यायला सक्षम होऊ शकत नाही.

3MinForMahaFarmers

1 thought on “उत्पन्नाचे मार्ग – आर्थिक सुरक्षेचा आधार”

  1. Sharad D Nilkanthwar

    आवटे जी आपला लेख आवडला..
    आपल्या मराठावड्याचे कवी इंद्रजित भालेराव सराच्या ओळी.. त्यातून ग्रामीण भागातील शेतरस्ते खरंच काट्या कुट्या चा रस्ता गावाकडं चल माझ्या दोस्ता….
    पांदन रस्ते आता कुठे मोकळा श्वास घेत आहे..
    जबरदस्त 👍🌹💐💐

Leave a Reply

Scroll to Top